चंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालयाने यंदाही आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. दरम्यान महाविद्यालयाच्या बारावीच्या वाणिज्य विभागात शिकणारी सानिका सुदेश झुलकंठीवार ही विद्यार्थिनी सर्वाधिक गुण मिळवून चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम आल्याने महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रत्येक विद्यार्थांच्या करिअरची दिशा ठरविणाऱ्या बारावीच्या परीक्षेत वाणिज्य विभागात ९५.१७ टक्के गुण घेऊन महाविद्यालयातील वाणिज्य विभागाची सानिका सुदेश झुलकंठीवार ही विद्यार्थिनी चंद्रपूर जिल्ह्यातून सर्वप्रथम आलेली आहे.
या यशाबद्धल सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम. काटकर यांनी स्वतः तिच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबासह कौतुक करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सी. जे. खैरवार, कनिष्ठ विज्ञान विभागप्रमुख प्रा. राजकुमार चंद्रात्रे, डॉ. शीतल कटकवार, प्रा. शिफाली कुम्मरवार, प्रा. किशोर भावरकर प्रामुख्याने उपस्थित होते. सानिकाने आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई- वडिलांसह महाविद्यालयाच्या शिक्षकांना दिले आहे.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधाताई पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम. काटकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सानिका हिचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत