कारचा टायर फुटला अन्.... #Chandrapur #chimur #Accident


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) शार्दुल पचारे, चिमूर 
चिमूर:- चिमूर जवळील पिंपळनेरी येथील राजूरकर परिवारातील लग्न आटोपून स्वगावाकडे चिमूर उमरेड असा प्रवास चारचाकी वाहनाने परत जात असतांना चिमूर भिसी उमरेड मार्गावरील उमरी फाट्या जवळ चारचाकी वाहनाचे डावा टायर फुटल्याने पलटी झाली असून या अपघातात सत्यभामा बाळकृष्ण झिलपे रा. कुही (वय ७५ वर्ष) या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून अन्य दोन व्यक्ती जखमी झाले.

पिंपळनेरी येथील राजूरकर परिवाराचे मिलन लानमध्ये लग्न होते. चिमूर येथील मिलन लॉन मध्ये होते. लग्न आटोपून चिमूर उमरेड मार्गे कुहीकडे चार चाकी क्र. एमएच ४० सिएच ३४४६ या वाहनाने घरची मंडळी जात असतांना पिंपळनेरी समोरील उमरी फाट्या जवळ चारचाकी वाहनाचा डावा टायर 5 वाहनाने दोन पलटी झाले असता या अपघातात सत्यभामा बाळकृष्ण झिलपे रा. कुही (वय ७५ वर्ष) या महिलेचा मृत्यू झाला असून सुनीता भोजराज झिलपे (वय ४८वर्ष) व भोजराज बाळकृष्ण झिलपे ( वय ५२वर्ष) जखमी झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या