Top News

डॉ सतिश वारजूकर यांच्या आंदोलनाच्या पवित्र्याने आठवडी बाजाराचा तात्पुरता वाद मिटला #Chandrapur #chimur


कृषी उत्तपन बाजार समितीच्या आवारात आठवडी बाजार

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) शार्दुल पचारे, चिमूर
चिमूर:- चिमूर आठवडी बाजारात नगर परिषद कर्मचारी यांनी शेतकरी व भाजीपाला विक्रेत्यांच्या मालाची नुकसान केल्याची घटना घातल्याचा प्रकार उगडीस आल्यानंतर डॉ सतिश वारजूकर यांनी भाजीपाला विक्रेत्यांच्या भेटी घेऊन लगेच तातडीची पत्रकार परिषद घेत जिल्हाधिकारी यांनी नगर परिषद मुख्याधिकारी याना निलंबित करण्यात यावे अशी मागणी पत्रकार परिषदेत केली होती व 19 मे ला मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती या वेळी डॉ सतिश वारजूकर यांनी दिली होती. व मीडिया ने मोर्चा ची बातमी प्रसारित केली होती.
चिमूर येथील आठवडी बाजार मुख्य मार्गावर भरत असताना मुख्य मार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीला मोठी अडचण निर्माण झाली होती. चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार भांगडीया यांचे समर्थकांनी एक महिन्याआधी आमदार भांगडिया यांचे प्रयत्नांनी बाजाराला केली जागेची व्यवस्था अश्या प्रकारच्या पोस्ट शोषल मीडियावर व्हायरल करण्यात आल्या होत्या. पण प्रत्यक्षात ती जागा बसण्यायोग्य नसल्यानें. आठवडी बाजार मुख्य मार्गावर बसू लागला मात्र प्रत्येक बाजाराच्या वेळेस नगर परिषद कर्मचारीच्या त्रासामुळे भाजीपाला विक्रेत्यांमधे रोष निर्माण व्हायचा.
डॉ सतिश वारजूकर यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिका मुळे आठवडी बाजार स्थलानतर संदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालय चिमूर येथे आढावा बैटक घेण्यात आली. व बैटकित झालेल्या विचार विनिमय नुसार आठवडी बाजाराचा नवीन जागा तयार होई पर्यंत तात्पुरता आठवडी बाजार कृषी उत्तपण बाजार समितीच्या आवारात घेण्याचे ठरले असून बाजाराच्या नवीन जागेसाठी आमदार भांगडिया यांनी 50 लाख निधी देण्याची घोषणा या वेळी केली.
या वेळी आमदार किर्तिकुमार भांगडिया जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ सतिश वार्जूकर. उपविभागीय अधिकारी प्रकाश संपकाळ. पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी. पोलीस निरीक्षक मनोज गभने. नगर परिषद मुख्याधीकारी डॉ सुप्रिया राठोड यांचे सह भाजी विक्रेते उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने