Top News

शासनाचा स्पर्धेच्या पत्रकात सावलीचा बसस्थानकाचा फोटो #chandrapur #saoli


शिंदे-फडणवीस सरकार चे नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी मानले आभार

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

सावली:- महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वच्छ व सुंदर बसस्थानक ही स्पर्धा सुरू केली आहे त्याला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ-सुंदर अभियान असे नाव दिले असून या स्पर्धा पत्रके शासनाचा वतीने जाहीर करण्यात आले. त्यात स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा फोटो तसेच त्यात सावली बसस्थानकाचा फोटो टाकण्यात आलेला आहे.ही पत्रके संपूर्ण महाराष्ट्र भर फिरणार आहे. महाराष्ट्र मध्ये सावली (जिल्हा चंद्रपूर) चा बसस्थानक हा जाणार आहे. त्यामुळे सावली वासीयांसाठी ही गौरविण्यात येणारी बाब असून शासनाच्या स्पर्धेच्या प्रचार यंत्रणेत सावली बसस्थानकाचा फोटो दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस,पालकमंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार, खासदार अशोकजी नेते,आमदार विजयभाऊ वडेट्टीवार व माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांचे सह शिंदे-फडणवीस सरकार चे आभार सावली येथील नगरसेवक, गटनेता तथा भाजप महामंत्री सतीश बोम्मावार यांनी मानले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने