Top News

अपघात प्रकरणातील आरोपीस न्यायालयाने ठोठावली शिक्षा #chandrapur #bramhapuri

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

ब्रम्हपुरी:- दिवाणी व फौजदारी न्यायालय ब्रम्हपुरी येथे भांदवी कलम २७९,३०४(अ) अन्वये फौजदारी मामला क्रमांक १३१/२०२२ प्रलंबित होता. मामल्यातील फिर्यादी नामे गणेश जीवन ढोरे राह. सोनेगाव यांनी आरोपी नामे विनोद मुर्लीधर तलमले राह. सावलगाव याच्याविरुद्ध स्वतःच्या ताब्यातील ट्रॅक्टर निष्काळजीपने चालवून फिर्यादी व त्याच्या ६ वर्षीय मुलाला ट्रॅक्टर खाली दाबले. यात ६ वर्षीय मुलाला गंभीर दुखापत झाली त्यामुळे त्याला गंभीर अवस्थेत दवाखान्यात भरती करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्यामूळे फिर्यादी यांनी आरोपी विरुध्द फिर्याद दाखल केली व आरोपीविरुद्ध मिळुन आलेल्या भक्कम पुरावाच्या आधारे न्यायाधीश श्री.आर.एन.पाठक यांनी आरोपी नामे विनोद मुर्लीधर तलमले राह.सावलगाव याला कलम २७९ अन्वये ६ महिन्याची शिक्षा व ५०० रुपये दंड तसेच कलम ३०४(अ) अन्वये २ वर्षाची शिक्षा व ५०० रुपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास १ महिन्याचा साधा कारावासाची सुनावली.

सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे व हेड कॉन्स्टेबल अरुण पिसे यांनी केला तर सरकारपक्षातर्फे ॲड.गणेश राऊत यांनी काम बघितले.सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर आंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली व कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पो.हवा.सुदेश कुमरे आणि पो.हवा.ध्रुवबाळ पिलारे यांनी काम बघितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने