भिवापूर येथे पेट्रोल पंप मालकाची चाकू भोसकून हत्या #chandrapur #nagpur #murder

Bhairav Diwase
0


https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

नागपूर:- जिल्ह्यातील भिवापूर येथील पेट्रोल पंप मालकाची दुचाकीवर आलेल्या तिघांनी चाकू भोसकून हत्या केली. बुधवारी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दिलीप राजेश्वर सोनटक्के (60) रा. दिघोरी नागपूर असे मृत पेट्रोल पंप मालकाचे नाव आहे. दिलीप सोनटक्के हे भिवापूरजवळील मुळगाव कोलारी (जिल्हा चंद्रपूर) येथील रहिवासी आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून नागपुरातील दिघोरी परिसरात कुटुंबासह राहतात.

मिळालेली माहितीनुसार, दिलीप सोनटक्के यांचा भिवापूर येथे राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोल पंप आहे. दिलीप रोजप्रमाणे सकाळी १० च्या सुमारास नागपूरहून कारने भिवापूर पेट्रोल पंपावर आले. ते पंपाच्या कार्यालयात बसले असताना १० ते १५ मिनिटांनी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पेट्रोल पंपाच्या कार्यालयात घुसून दिलीप यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. यावेळी दोन कामगार बाजूच्या खोलीत हिशोब करत होते, तर दोन कामगार बाहेर मशीनवर काम करत होते. दरम्यान, आरोपींनी कर्मचाऱ्यांना पिस्तूल दाखवून धमकावले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. एका कर्मचाऱ्याच्या डोक्याला पिस्तुलाचा मार लागला. कर्मचाऱ्याने पळ काढताच दिलीपला रक्ताच्या थारोळ्यात टाकून आरोपी पेट्रोल पंपाचा गल्ल्यातून सुमारे दोन लाख रुपये काढत तेथून फरार झाले. या घटनेचे सर्व लाईव्ह फुटेज पेट्रोल पंपच्या आत आणि बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

दरम्यान, आरोपी पळून जाताच दोन कर्मचाऱ्यांनी पोलिस स्टेशन गाठले. सहायक पोलिस निरीक्षक शरद भस्मे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनास्थळावरून चाकू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)