चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र सीआरपीएफ जवान वैभव वाघमारे यांचे निधन #chandrapur #gadchiroli #chimur

Bhairav Diwase
4

Google ads.
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नेरी जवळील पांढरवानी येथील वैभव दशरथ वाघमारे सीआरपीएफ मध्ये देश सेवेसाठी पुलवामा येथे कार्यरत असतांना घरगुती कामासाठी सहा दिवसांपूर्वी स्वगावी पांढरवानी आला होता. अचानक प्रकृती अस्वस्थ वाटत असल्यामुळे उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेत असता जवान वैभवची प्राणज्योत मावळली.

वैभव दशरथ वाघमारे (वय ३० वर्ष ) विवाहित असून पुलवामा येथे सीआरपीएफ जवान म्हणून कार्यरत असतांना पाच सहा दिवसा पूर्वी स्वगावी आला होता. दि १५ मे सकाळी ११ वा दरम्यान त्याची प्रकृती अस्वस्थ झाल्याने उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी नेत असता हृदयाच्या तीव्र धक्क्याने प्राणज्योत मावळली.
त्यांच्या मृत्युने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार दि १६ मे ला पांढऱवानी येथे होणार आहे.

त्यांच्या मृत्यू पश्चात आई ,वडील व भाऊ आहे. वैभव वाघमारे यांचा लहान भाऊ विशाल वाघमारे हा बीएसएफ जवान बांगला देश सीमेवर कार्यरत आहे.देशसेवेसाठी दोन्ही भाऊ कर्तव्यावर होते परंतु वैभव यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण परिसरासहित तालुक्यात शोककळा पसरली आहे

टिप्पणी पोस्ट करा

4टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा