चंद्रपूर जिल्ह्यात जिन्यावरून खाली पडल्याने एकाचा मृत्यू #chandrapur #mul #death

Bhairav Diwase

Google ads.
मुल:- घराच्या स्लॅबवरून रात्रौला झोपेतून लघुशंकेसाठी जिन्यावरून उतरताना तोल गेल्याने खाली पडून राजू नथुजी मोरे यांचा जागीच मृत्यू मृत्यू झाला. ही घटना मुल तालुक्यातील नांदगाव वार्ड क्रमांक एक मधे घटना घडली आहे.

राजू हा दिवसभर शेतात काम करून घरी आल्यानंतर रात्र जेवण करून वरती स्लॅबवर झोपायला गेला रात्रौला जिन्यावरून लघुशंकेसाठी खाली उतरताना तोल गेल्याने जमिनीवर पडला लगेच त्याला मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. राजूच्या मृत्यूमुळे कुटुंब शोक सागरात बुडाले आहे. एक लहान मुलगी, पत्नी, दोन विवाहित भाऊ व आई-वडील असा बराच मोठा परिवार असून राजूच्या अचानक जाण्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.