वरूर रोड येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी.

Bhairav Diwase
0
वरूर रोड येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी.



Google ads.
राजुरा:- तालुक्यातील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरुर रोड येथील विद्यार्थ्यांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम बुद्ध विहार डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक वरूर रोड येथे घेण्यात आला. सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रुती बोरकर, प्राची खडसे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा युगप्रवर्तक व्यक्तिमत्वाचा सहवास छत्रपती संभाजी महाराजांना लाभलेला आहे.त्यामुळे एक प्रचंड ताकतीच व्यक्तिमत्त्व म्हणजे संभाजी राजांची जडणघडण होय.असे प्रतिपादन वनिता लाटेलवार यांनी केले.संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील काही जीवनमूल्य घेऊन आपण नवा समाज निर्माण करू शकतो.एक नवी प्रेरणा समाजाला देऊ शकतो असे मार्गदर्शन विशाल शेंडे यांनी केले.

सदर कार्यक्रमाला सरपंच गणपत पंधरे, उपसरपंच विजया करमनकर, मार्गदर्शक म्हणून वनिता लाटेलवार, लैजाबाई रामटेके, विमलबाई निरांजने, विश्रांती आत्राम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल शेंडे यांनी तर आभार प्रवीण चौधरी यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रज्वल बोरकर, मयूर जानवे, स्वप्नील जीवतोडे, सागर बोरकर, श्रुती बोरकर, बालाजी करमनकर, प्रवीण चौधरी ,साहिल मडावी यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)