Top News

छत्रपती संभाजी महाराज जयंती सोंडो येथे प्रथमच साजरी.

छत्रपती संभाजी महाराज जयंती सोंडो येथे प्रथमच साजरी.Google ads.
राजुरा:- मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड शाखा राजुरा तर्फे राजुरा तालुक्यातील सोंडो येथे मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजी महाराज यांची 366 वी जयंती शिवप्रेमी आसिफभाऊ सय्यद यांच्या प्रमुख मार्गदर्शनात दिनेश पारखी यांच्या संकल्पनेतून साजरी करण्यात आली.
     
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्माला दिनांक १४ मे २०२३ रोजी ३६६ वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्ताने केवळ ३२ वर्षे आयुष्य लाभलेले छत्रपती संभाजी राजांचे महान जीवनचरित्र, अनेक कार्य, प्रसंग, घटना, साहित्य लिखाण, स्वराज्याचा विस्तार व संवर्धन, बालपण व शिक्षण, त्यांच्यावर झालेले संस्कार, महाराजांची शौर्यगाथा इत्यादी. छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या लाखो हजारो कार्याची माहिती घराघरात, गावागावात जावी आणि लहान बालकांवर कसे संस्कार केले पाहिजे यासाठी पालकांनी काय करावे, तरुणांनी संभाजी महाराज यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन बहुभाषिक होवून जगात अनेक ठिकाणी जाऊन श्रीमंत व्हावे, आपले करिअर कसं करावं याचे अनेक धडे संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेतून घेता येत असून आज वर्तमान काळात संभाजी महाराज यांचे प्रेरणादायी जीवनकार्य समजून घेणे आवश्यक झाले आहे. त्यामुळेच सर्व शंभूप्रेमी, शिवप्रेमींनी सोंडो गावात संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात इतिहासात पहिल्यांदाच साजरी केली.
        छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव दिमाखात पार पाडण्यासाठी आसिफ सय्यद यांच्यासोबत जंगा कोवे, बबन गंधफाड़े, सुधाकर वडस्कर, इब्राहिम सय्यद, गणपत निकुरे, सरिता जिटापेनवार, श्रीनिवास मिसलवार, संजय साईनवार, संतोष साईनवार, गोपाल बोलूवार, लटारू कौरासे, बाबूराव पांडव, अमोल मालखेडे, संभाजी इपावार, लटारू कौरासे, जयपाल उडतलवार, धनविजय झाडे, समीर सय्यद, सुरेश आईलमेनवार, गणपत बल्की, चांद सय्यद, राजू जिटापेनवार, सूरज पेटकर, विजय बोलूवार, सागर पिपरे, सनय येगीनवार, रवी गुरनुले यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने