चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकी चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला अटक #Chandrapur #bramhapuri #arrested

Bhairav Diwase

Google ads.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी 
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी शहरातील ग्रामीण रुग्णालय येथील डॉ. शुभम शेरकुले यांनी सकाळच्या सुमारास आपली एम.एच ३३- ५५५७ दुचाकी वाहन रुग्णालयातील आवारात ठेवून रुग्णालयात ओपीडी करिता गेले. काही वेळानी आरोपी सुषमा/पिंकी विशाल चाचेरकर वय ३५ रा. भवानी वार्ड ब्रम्हपुरी व सादम कादेर हलदार वय ३१ रा. सिकंदरपुर ता- मंदिरबाजार जिल्हा-उत्तर २४ पं.बंगाल सध्या वास्तव्य भवानी वार्ड ब्रम्हपुरी हे सुमारे ९:३० वाजता आपल्या दुचाकी एम.एच.३४ ए.एन- ५८८९ वाहनाने ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे आले. आपली दुचाकी ठेऊन डॉक्टर शुभम शेरकुले यांची दुचाकी घेऊन पसार झाले व आपली दुचाकी गाडी दुसऱ्या व्यक्ती ला पाठवुन दुचाकी गाडी पसार केली.
डॉक्टर रुग्णालयातून घरी जाण्यासाठी निघाले तर दुचाकी गाडी चोरी झाल्याचे दिसून आले. यांची माहिती ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला देण्यात आले. लगेच ब्रम्हपुरी पोलीसांनी सी.सी.टिव्ही फुटेज तपासणी करून दुचाकी चोरी करणारे बंटी-बबली आढळून आले. लगेच भवानी वार्ड ब्रम्हपुरी येथे जाऊन दोन्ही आरोपीला अटक करण्यात आली.

सदर तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मिंलीद शिंदे व पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे याच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. तेजराम जंनबधु,योगेश शिवनकर,विजय मैद,मुकेश गजभे,संदेश देवगडे यांनी केले.