दहावीच्या विद्यार्थिनीवर 'इंस्टाग्राम फ्रेंड'चा बलात्कार #chandrapur #nagpur #rape
Google ads.
नागपूर:- इंस्टाग्रामवरून ओळखी झालेल्या मित्रानेच दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला. घरी गेल्यानंतर पोटात दुखत असल्याची तक्रार विद्यार्थिनीने केल्यानंतर आईच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अजनी पोलिसांनी आरोपी निखिल ऊर्फ आकाश विजय शर्मा (२२, अजनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी ही अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. ती दहावीची विद्यार्थिनी आहे. तिला इंस्टाग्रामवर चित्रफिती तयार करण्याची सवय आहे. तिची इंस्टाग्रामवर निखिल शर्माशी ओळख झाली. तो दहावीपर्यंत शिकला असून सध्या बेरोजगार आहे. दोघांची काही दिवस इंस्टाग्रामवर संवाद सुरु झाला. त्यानंतर दोघांच्या भेटी झाल्या. निखिल हा तिच्यासोबत शाळेपर्यंत जायला लागला. निखिलने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला तो शाळेत जाण्याला विरोध करुन फिरायला जाण्यासाठी तगादा लावत होता.

११ मे रोजी रात्री साडेआठ वाजता अल्पवयीन मुलगी ही सायकलने घरी जात होती. निखिलने तिला फिरायला जाण्यासाठी पुन्हा तगादा लावला. तिनेही होकार दिला. त्याने थेट तिला स्वत:च्या घरी नेले. घरी कुणीही नसल्याची संधी साधून त्याने मुलीशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. रात्री दहा वाजता मुलगी घरी गेली. तिने मैत्रिणीकडे गेल्याचा बहाणा सांगितला. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास पोट दुखत असल्याची तक्रार तिने आईकडे केली. आईने थोडा धीर दिला. तिची अवस्था बघून काहीतरी विपरीत घडत असल्याचे आईच्या लक्षात आले. आईने तिची आस्थाने विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. तिची प्रकृती बिघडल्यामुळे सकाळी तिला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करून पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिली. या प्रकरणी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून निखिल शर्माला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत