सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय चंद्रपूरचा "प्रतीक" #chandrapur #gadchiroli #Pratikwadhai
Google ads.
प्रतीक देवप्रकाश वाढई चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागाडा या गावात 16 एप्रिल 1999 शेतकऱ्यांच्या घरात जन्म घेतला. प्रतीक विज्ञान शाखेत व्दितीय वर्षांचे शिक्षण झाल्यानंतर प्रतीक ने शिक्षण सोडले. त्याच कारण गावात राहणारा, चार चौघात मिळून राहणारा, नेहमी हसत राहणारा प्रतीक. जेव्हा शहराकडे शिक्षण घेण्यासाठी गेला. तेव्हा तो शहरात अनजान होता. शहरात मित्र नसल्याने त्याला गमंत नव्हते. पण तो शहरात राहण्याचा प्रयत्न करू लागला. पण मध्येच कोरोना लागला. मग प्रतीक आपल्या गावाकडे गेला तो परत शहराकडे आलाच नाही. त्याने अर्ध्यावर शिक्षण सोडले. कोरोना काळात घरी बसून असलेल्या प्रतीक ने स्वःताच्या नावाने सोशल मीडियावर अकाउंट तयार केला. स्वतःचे व्हिडिओ आणि ब्लॉग तयार करून सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करु लागला. बघता बघता सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतीक सर्वांच्या परिचयाचा झाला. सोशल मीडियावर प्रतीक धुमाकूळ घालतोय. सध्या 143K इंस्टाग्राम फॉलोअर्स तर 24.5K YouTube subscriber आहेत.

प्रतीक लोकांना हसवतो आणि सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करतो. त्या काळापासून आजपर्यंत लोकांना हसवतोय. लहानपणापासून ते ज्येष्ठांपर्यंत लोकांना प्रतीक चे व्हिडिओ पाहायला आवडतात. लोकांचा पाठींबा हा त्याच्या जीवनाची प्रेरक शक्ती आणि प्रमुख प्रेरक घटक आहे. सर्व कलाकारांप्रमाणे, त्याचे जीवन संकटे आणि यशांनी भरलेले आहे, कायमस्वरूपी नाही, परंतु तो प्रामाणिक आणि मूळ काम करण्यासाठी आपली प्रतिष्ठा वापरण्याची आकांक्षा बाळगतो.

प्रतीकने जीवनात काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतो. आणि कधीही हार मानत नाही. प्रतीक म्हणतो, "सामग्री तयार करण्यासाठी तुम्हाला नेहमीच उत्तम सेटअपची आवश्यकता नसते, परंतु आमच्या हातात असलेल्या गोष्टींद्वारे कला तयार केली जाऊ शकते." प्रतीक आपल्या कामाची सुरुवात मोबाईल फोनने केली. त्याच्या गावातील मित्रांनी व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रतीक ला मदत करु लागले. तसे व्हिडिओ मध्ये काम सुध्दा करु लागले. प्रतीक म्हणतो “तुमच्या करिअरचा निर्णय घेणाऱ्या लोकांसमोर तुमची प्रतिभा दाखवण्यासाठी तुम्हाला मुंबई किंवा दिल्लीला जाण्याची गरज नाही. तुम्ही फक्त जागे व्हा, तुमचा फोन घ्या आणि लिहा, शूट करा, संपादित करा.

*✍️भैरव धनराज दिवसे*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या