नंदविजय जिनिंग व प्रेसिंगमध्ये भीषण आग #chandrapur #Korpana #Fire #firenews

Bhairav Diwase



Google ads.
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- राजुरा- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कोरपना तालुक्यातील सोनुर्ली येथील नंदविजय जिनिंग व प्रेसिंग येथे गुरुवार दुपारच्यासुमारास भीषण आग लागली. या आगीत जिनिंगमधील अनेक साहित्यांची राखरांगोळी झाली.

जिनिंगमध्ये अचानक लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने सरकी, बारदाना, मशिनरी आदी वस्तू जळून खाक झाल्या. यात अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे कळते. 

आगीची घटना घडताच लागलीच कोरपना नगरपंचायत, अल्ट्राटेक, अंबुजा, दालमिया, माणिकगडच्या अग्निशमन वाहनांना पाचारण करून आग नियंत्रणात आणली. वेळीच घेतलेल्या सतर्कतेमुळे पुढील नुकसान टळले. सदर जिनिंग कोरपना येथील नितीन बावणे, प्रफुल्ल बावणे यांच्या मालकीचे आहे. घटनेचा पुढील तपास कोरपना पोलिस करीत आहेत.