Top News

कोरपना बाजार समितीत भाजपाला भोपळा #chandrapur #Korpana


विधानसभेत आमदार सुभाष धोटे विरुद्ध माजी आमदार वामनराव चटप लढतीचे स्पष्ट संकेत?


कोरपना:- नुकतेच कोरपना बाजार समितीचे निकाल हाती आले. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या युतीने निर्विवाद वर्चस्व मिळविले. या निवडणुकीत शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना दुसऱ्या पसंतीची मते मिळाली. हमाल, मापारी, अडते, व्यापारी व सेवा सहकारी संस्था आदी गटांमध्ये शेतकरी संघटनेच्या उमेदवारांनी काट्याची टक्कर दिली. अवघ्या दोन-पाच मतांनी काही ठिकाणी पराभव झाला. भाजपाला मात्र अजून बाजार समितीत अस्तित्वही निर्माण करता आले नाही.

हेही वाचा:- महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत घडला होता रक्तपात

भाजपात दोन माजी आमदारांनी ताकद लावुन भाजपा शून्यावर थांबली. ग्रामीण भागात दोन-चार ग्रामपंचायती वगळता शेतकरी संघटना विरुद्ध कॉंग्रेस अशीच लढत तालुक्यात होत असते. या निवडणुकीने तीन बाबी स्पष्ट झाल्या आहेत. प्रथम, भाजपाला अजूनही कोरपना तालुक्यातील ग्रामीण जनतेने स्वीकारले नाही. दूसरे, काँग्रेसचा तालुक्यात विरोधी पक्ष म्हणून शेतकरी संघटनेने कायम ठेवले आहे. तिसरे,आगामी विधानसभेत कोरपना तालुक्यात काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे विरुद्ध शेतकरी संघटनेचे माजी आमदार वामनराव चटप यांच्या थेट लढतीचे स्पष्ट संकेत ग्रामीण मतदारांनी दिले आहे.

शेतकरी संघटना सत्ता मिळवू शकली नाही या असुरी आनंदात भाजपाने राहु नये. शेतकरी संघटनेला मिळालेले मताधिक्य मोठे आहे. तूलनेने भाजपाला अत्यंत कमी मते दिसतात असे जानकार बोलताना दिसतात. काँग्रेस व राष्ट्रवादी युतीला १३, शेतकरी संघटना व गोंडवानाला ५ जागा मिळाल्या आहे. तर भाजपाला खातेही उघडता आले नाही. शेतकरी संघटना व गोंडवाना युतीचा जीवती तालुक्यात प्रभाव वाढत असुन तिथेही भाजपाचे अस्तित्व दिसत नाही. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभेत काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे विरुद्ध शेतकरी संघटनेचे माजी आमदार वामनराव चटप यांच्या लढतीचे स्पष्ट संकेत ग्रामीण मतदारांनी दिले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने