गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप ने मारली बाजी
गोंडपिपरी:- चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा, गोंडपिपरी आणी जिवती या तीन बाजार समितीची मतमोजणी नुकतीच पार पडली आमदार सुभाष धोटे यांचे क्षेत्र असलेल्या गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समिती भाजप ला मोठे यश मिळाले आहे.
हेही वाचा:- महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत घडला होता रक्तपात
शेतकरी विकास काँग्रेस समर्पित पॅनेलला पराभवाचा सामना करावा लागला. केवळ सहा जागा जिंकता आल्या तर भाजपा समर्पित परिवर्तन शेतकरी विकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे बारा जागेवर विजय मिळवित गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समिती सत्ता काबीज केली आहे. गोंडपिपरी येथील पराभव आमदार सुभाष धोटे यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जातं आहे.