धानोरकर दाम्पत्यांचा गडातच पराभव #chandrapur #bhadrawati


भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचा (उध्दव बाळासाहेब ठाकरे) झेंडा


भद्रावती:- भद्रावती काँग्रेस खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांचे वास्तव्य आहे. धानोरकर कुटुंबाचे भद्रावती मूळ गाव असताना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे रवींद्र शिंदे यांनी स्वतःच्या बळावर ११ संचालक निवडून आणले. तर काँग्रेसचे केवळ सहा संचालक विजयी झाले. येथे एक अपक्ष अविरोध निवडून आला.

भद्रावती हा धानोरकर कुटुंबासाठी पराभवाचा जबर धक्का आहे. या बाजार समितीत प्रस्थापित नेत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. जिल्ह्यातील एकही बाजार समिती जिंकण्यात धानोरकर कुटुंबाला यश आले नाही. विशेष म्हणजे भद्रावती व वरोरा या स्वतःच्या मतदार संघात देखील धक्कादायक पराभव झाल्याने आगामी काळात धानोरकर यांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत