Top News

बाजार समितीच्या निकालानंतर काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर #chandrapur


खा. बाळू धानोरकरांचं आ. विजय वडेट्टीवारांना आव्हान


चंद्रपूर:- बाजार समितीच्या निकालानंतर जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खासदाराने जर आपलं क्षेत्र सांभाळलं नाही असं जर वाटत असेल तर तुम्ही लोकसभा लढा मी ब्रम्हपुरी पाहतो, असं आव्हान धानोरकर यांनी वडेट्टीवार यांना दिले आहे. सोबतच धानोरकरांनी विजय वडेट्टीवार फक्त माझ्यामुळेच मंत्री झाल्याचा दावा केलाय. तसंच चंद्रपूर बाजार समितीत वडेट्टीवार यांनी भाजपच्या पॅनलला साथ दिल्याने धानोरकर यांच्या पॅनलचा पराभव झाला अशी टीका केली आहे.

हेही वाचा:- महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत घडला होता रक्तपात

बाजार समितीच्या निकालानंतर जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष समोर आला आहे. बाळू धानोरकर यांनी माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे. विजय वडेट्टीवार फक्त माझ्यामुळे विरोधी पक्षनेते आणि मंत्री झाल्याचा दावा देखील त्यांनी केला. वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात कोणत्याच कार्यकर्त्यांचं काम केलं नाही. आमदाराला निधी दिला नाही, कार्यकर्ते मजबूत केले नाही असा आरोप देखील धानोरकर यांनी केला आहे. चंद्रपूर बाजार समितीत धानोरकर यांच्या पॅनल विरोधात वडेट्टीवार यांनी भाजपच्या पॅनलला साथ दिल्याने धानोरकर यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. त्यानंतर धानोरकर यांनी वडेट्टीवारांवर केली जोरदार टीका केली आहे. बाजार समितीच्या निकालानंतर काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने