वीज खांब घेऊन जाणारी ट्रॅक्टर पलटली #chandrapur #mul #accident

दोन मजुरांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

मुल:- ट्रॅक्टरवर सिमेंटचे वीज खांब नेताना अनियांत्रित होऊन ट्रॅक्टर (tractor) पलटी झाल्याने ट्रॅक्टरवर बसलेल्या दोन मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर एक मजूर गंभीर जखमी झाला. मागेहून येणारा सुपरवायझर हे दृश्य बघताच बेशुद्ध पडला. ही घटना आज शुक्रवारी मुल (mul) तालुक्यातील पिपरी दिक्षित गावाजवळ अपघात (accident) घडला. मिथून पांडुरंग मराठे (35), अंकुश राजू गंधश्रीवार (36) असे मृत मजुरांचे तर जखमी ईश्वर मांडवकर (37), तर मागेहून येणारा सुपरवायझर सुभाष रणदिवे (34) हे दृश्य बघताच बेशुद्ध पडला. सर्व राहणार केळझर ता. मूल असे जखमी मजुरांचे नाव आहे. (A tractor overturned carrying a power pole; Two laborers died on the spot)

मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित जवळील भंजाळी येथील एका शेतकऱ्यांच्या शेतात वीज डीपी लावण्याचे काम सुरु होते. त्यासाठी आवश्यक सिमेंट खांब ट्रॅक्टरच्या साह्याने पिपरी दीक्षितवरून आणताना काही अंतर पार केल्यानंतर पिपरीजवळ ट्रॅक्टर पलटी झाला. यात दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित करण्यात आले. मूल पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत