आ. बच्चू कडू यांचा जागतिक दिव्यांग अभ्यासक ऍना लँडरे यांच्याशी संवाद #chandrapur #Mumbai

Bhairav Diwase
0


मुंबई:- गेल्या २० वर्षांहुन अधिक काळापासून दिव्यांग हक्कांवार आमदार बच्चू कडू काम करत आहे. महाराष्ट्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे देशातील पहिले राज्य ठरले. यात बच्चू कडू यांचे मोठे योगदान राहिले हे सर्वश्रुत आहे. दरम्यान राज्यातील दिव्यांगांसाठी आणखी प्रभावीपणे काम होण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आखली गेलेली ध्येय धोरणं यांवर संवाद साधला. सध्या लंडन स्थित असणारे, जागतिक सार्वजनिक आरोग्य धोरणाचे अभ्यासक आणि ब्रिटीश शासनची चेवेनिंग स्कॉलर प्राप्त डॉ. ऋषीकेष आंधळकर यांनी ही बैठक घडवून आणली आणि या सर्व चर्चेचा समन्वय साधला. या बैठकीत अमेरिकेतील दिव्यांग सामाजिक कार्यकर्त्या ऍना लँडरे, चेवेनिंग स्कॉलर ॲड. दीपक चटप, शुभम दिक्सेना, राज मोहारे यांची उपस्थिती होती. ऑनलाईन माध्यमातून हा जागतिक संवाद साधण्यात आला.

जागतिक दिव्यांग सामाजिक कार्यकर्त्या ऍना लँडरे या संयुक्त राष्ट्र संघासहित आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत दिव्यांग धोरणांवर काम करतात. त्या लंडन येथील प्रसिद्ध युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात दिव्यांग विषयातील पीएचडी संशोधन करित आहेत. या चर्चेत ऍना यांनी आंतरराष्ट्रीय धोरणांची माहिती मांडली. लंडन येथिल रॉयल मेडीकल सोसायटीचे फेलो स्कॉलर डॉ. ऋषिकेष यांनी परदेशात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिव्यांगांचे आजाराबाबत दिले जाणारे क्षमता विकास प्रशिक्षण राज्यात सुरु करण्याबाबत भूमिका मांडली. चेवेनिंग स्कॉलर ॲड. दीपक चटप यांनी दिव्यांग कायदे व धोरण यात आवश्यक सकारात्मक बदलाविषयी भूमिका विशद केली. तर शुभम दिक्सेना यांनी तंत्रज्ञानात होत असलेल्या बदलाची प्राथमिक मांडणी केली.

आ. बच्चू कडू यांनी राज्यातील ३० लाख दिव्यांगांसाठी आरोग्य, शिक्षण व रोजगार निर्मिती या तीन क्षेत्रात विकासासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यासाठी काय करता येईल याबाबत मांडणी केली. राज्यातील दिव्यांग मंत्रालयाला अधिक निधी उपलब्ध करून दिव्यांग हक्कांसाठीचा पाठपूरावा अविरत सुरु राहिल असेही मत व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)