चंद्रपूर शहरात महिलेच्या हत्येने खळबळ #chandrapur #murder


Google ads.
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur District) सतत गुन्हेगारीचा (crime) आलेख वाढत आहे. चंद्रपूर शहरात (In Chandrapur city) एका 70 वर्षीय महिलेच्या हत्येची (murder) घटना उघडकीस आली आहे. या हत्येने चंद्रपूर शहरात खळबळ उडाली आहे. Woman killed in Chandrapur city

चंद्रपूर शहरातील नगीनाबाग (NaginaBagh) प्रभागातील चोर खिडकी (chor khidki) परिसरात राहणाऱ्या 70 वर्षीय शर्मिला शंकरराव सकदेवे या महिलेची निर्घृणपणे हत्येची घटना आज 16 मे या सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने (with a sharp weapon) वार केल्याच्या खुणा (marks) आढळून आल्या आहे.

घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस (Ramnagar police) व जिल्हा पोलीस अधीक्षक (District Superintendent of Police) परदेशी यांनी घटनास्थळ गाठत हत्या (murder) प्रकरणाची माहिती घेतली. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत