KYC च्या नावाने विचारणा झाली तर सावधान! #Chandrapur #chimur #KYC


चंद्रपुर जिल्ह्यातील व्यक्तीला एक फोन आला अन्.

Google ads.
चिमूर:- केवायसी करण्याच्या (KYC) नावाखाली चिमूर तालुक्यातील पळसगाव येथील पोस्ट ऑफिसच्या खात्यातील 5 हजार 200 रुपये बोगस बँक कर्मचाऱ्याने लंपास केल्याची घटना येथे उघडकीस आली.

पळसगाव येथील अक्षय प्रकाश मेश्राम ही व्यक्ती आई-वडिलांच्या मृत्यूनंतर लहान भावाचा सांभाळ करून कुटुंब चालवतो. पदरमोड करून गावातील पोस्टाच्या खात्यात काही पैसे जमा केले होते. मंगळवारी त्याला मोबाइलवर एका अज्ञात व्यक्तीचा फ्रॉड कॉल आला. बँकेचा कर्मचारी असून, तुमच्या पोस्ट खात्याचे केवायसी करायचे आहे, असे सांगून त्याने ओटीपी मागितला. अक्षय मेश्राम यांनी विश्वास ठेवून त्याला ओटीपी क्रमांक दिला. मात्र, काही मिनिटांतच त्याच्या पोस्ट खात्यातील 5 हजार 200 रुपये पैसे लंपास केल्याची घटना घडली.

मोबाइल बँकिंगने व्यवहार करताना जपूनच

आजकाल फसवणुकीसाठी नवनवीन पद्धती वापरल्या जात आहेत. इंटरनेट किंवा मोबाइल बँकिग करताना सावधानता बाळगा. कोणालाही क्रेडिट-डेबिट कार्ड डिटेल्स देऊ नका. डेबिट कार्ड सीव्हीव्ही, पीन नंबरची मोबाइलमध्ये ठेवू नका. बँक खाते लिक करताना सावधगिरी बाळगा. पोस्ट ऑफिसचा कोणताही कर्मचारी कॉल करीत नाही, ओटीपी मागत नाही, अशी माहिती पळसगाव येथील पोस्ट मास्टर युवराज बनसोड यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत