गोसेखुर्द प्रकल्पातील कालव्याच्या कामावर विद्यूत शॉक लागून कामगाराचा मृत्यू #chandrapur #nagbeed #Electricshock

Bhairav Diwase
0

Google ads.
चंद्रपूर:- दोन वर्षापासून सुरू असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पातील कालव्याच्या कामावर एका २५ वर्षीय कामगाराचा विद्यूत शॉक (Electricshock) लागून मृत्यू death झाल्याची घटना घडली. रविवारी (दि. १४ मे) सकाळी साडेनऊच्या सुमारास नागभीड (Nagbeed) तालुक्यातील आलेवाही (खरकाडा) येथे ही घटना घडली. राहूल दिवाकर चिमलवार (रा. जिवनापूर) असे मृत कामगाराचे नाव आहे. कंपनीतर्फे कामगारांना सुरक्षा पुरविण्यात येत नसल्याने मृत्यूप्रकरणी कंपनीला दोषी ठरवत कुटूंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मृतेदह संबंधित कंपनीच्या कार्यालयातच होता.

मिळालेल्यामाहिती नुसार, नागभीड तालुक्यातील आलेवाही खरकाडा परिसरात गोसेखुर्द प्रकल्पाच्या खुल्या कालवा २चे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. कालव्याच्या कामाचे कंत्राट नवभारत नावाच्या कंपनीला मिळालेले आहे. राहूल चिमलवार (२५ वर्षीय) हा मागील दोन वर्षांपासून कालव्याच्या कामावर कार्यरत आहे. रविवारी जिवनापूर येथील राहूल चिमलवार हा नेहमी प्रमाणे कामावर गेला होता. दरम्यान साडेनऊच्या सुमारास कालव्यावर काम करीत असताना लोखंडी सळाखीचा कालव्यावरून गेलेल्या हायहोल्टेज विद्यूत तारांना स्पर्श झाल्याने त्याला जबर विद्यूत शॉक लागला. यानंतर त्याला लगेचच ब्रम्हपूरी येथील रूग्णालयात हलविण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह सायंकाळी जिवनापूर येथे आणण्यात आले. परंतु कंपनीने कोणतीही सुरक्षा न पुरविल्यानेच राहूलचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृत कामगाराच्या कुटूंबियांनी मृतदेह घेण्यास नकार दिला.

राहूल हा कुटूंबियांचा एकुलता एक कमावणारा मुलगा होता. त्याच्या मृत्यूने कुटूंबिय उघड्यावर आल्याने आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली. कुटुंबियांनी मृतदेह न स्विकारल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. तळोधी पोलिसांनी घटनास्थळी जावून परिस्थीती हाताळली. मृतदेह स्विकारण्यास नकार दिल्याने गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण होत असताना कंपनीने कामागराचा मृतदेह कंपनीमध्ये नेला. सायंकाळी सातच्या सुमारास मृतकाच्या कुटूंबियांना चर्चेसाठी बोलविण्यात आले. यावेळी कुटूंबियांनी १५ लाखाची मागणी केली. कंपनी व कुटूंबिय व पोलिसांच्या समक्ष झालेल्या चर्चेतून कंपनीने १५ लाख देण्याचे मान्य केले. तत्काळ २ लाख देण्यात आले. त्यानंतर कुटूंबिय मृतदेह स्विकारण्यास तयार झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)