डॉ. आंबेडकर यांच्यामुळेच महिला गुलामीतून बाहेर:- डॉ.स्निग्धा कांबळे #chandrapur #bramhapuri

Bhairav Diwase

नान्होरी येथील व्याख्यानमालेत केले व्यक्त मत

Google ads.
ब्रम्हपुरी:- भारतीय समाजात पुरुषांपेक्षा स्रियांना कमी लेखण्याचा प्रघात होता.त्यांना पुरेसे अधिकार नव्हते.अत्यंत नामुष्कीचे जीने स्त्रीयांच्या वाट्याला होते.हक्क आणि अधिकार यापासून कोसो दूर असनाऱ्या स्त्रियांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध समस्यापासून मुक्त केले.दमनकारी संस्कृतीतून स्त्रियांना मुक्त करून मनाचे स्थान संविधानाच्या माध्यमातून प्राप्त करून देण्याचे महत्कार्य महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.त्यामुळे समाजातील सर्व स्त्रीवर्गाने आंबेडकर यांच्या विचार जनमानसांपर्यंत पोहचवावे असे प्रतिपादन डॉ.स्निग्धा कांबळे यांनी नान्होरी येथे 'हिंदू विवाह कायदा आणि डॉ.आंबेडकर' या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रमातील पहिल्या सत्रात केले.
दोन सत्रात हा कार्यक्रम पडला.दुसरे सत्र डाखराम गायकवाड आणि संच यांच्या गायनाच्या कार्यक्रमाने संपन्न झाला.व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष नान्होरी येथील सरपंच शुभांगी राऊत ह्या होत्या.पहिल्या सत्रासाठी मार्गदर्शक डॉ.स्निग्धा कांबळे,प्रा.सरोज शिंगाडे,प्रा.भीमादेवी डांगे,प्रा.निकिता वासनिक आदींनी आपले विचार व्यक्त केले.
दुसऱ्या सत्रातील संगीतमय कार्यक्रमाचे उदघाटक प्रा.डॉ.देवेश कांबळे आणि सहउदघाटक भीमराव बनकर हे होते.सदर कार्यक्रम नेताजी मेश्राम माजी पं.स.सभापती यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी इंजि.मिलिंद मेश्राम,इंजि.संजय कांबळे,जगदीश मेश्राम,शंभरकर साहेब,प्रदीप मेश्राम,अनुप वासनिक,सुरेंद्र वासनिक,देवानंद कांबळे,बाबा मेश्राम,रत्नघोष नान्होरीकर,विजय राऊत,राकेश वासनिक,प्रमोद बनकर,संजय शेंडे उपसरपंच,शरद भोयर,शरद वनकर,राजेंद्रकुमार लांडगे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभार मनीषा घरडे हिने केले.