चंद्रपूर जिल्ह्यात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या #chandrapur #nagbeed #suicide


नागभीड:- नागभीड तालुक्यातील इरव्हा (टेकरी) परिसरातील शेतशिवारात एका इसमाने अंगावरील शर्टच्या साह्याने मोहफुलाच्या झाडाला गळफास घेऊन दि. 2 मे रोजी सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

प्राप्त माहिती नुसार प्रकाश महादेव सावसाकडे (40) रा. कान्पा येथील रहिवासी असल्याचे सांगितले आहे. आत्महत्या केल्याचे कारण कळू शकले नाही. नागभीड पोलीसांनी शव ताब्यात घेत पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे पाठवले असून पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत