Top News

खासदार व आमदार आमने सामने #chandrapur #pombhurna

पोंभुर्णा कृ. उ. बा समिती निकालानंतर काँग्रेसमध्ये श्रेयवाद

तालुकाध्यक्ष म्हणतात, कृ. उ. बा. समितीतील विजय हा महाविकास आघाडीचा विजय


पोंभूर्णा:- पोंभूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक व मतमोजणी ३० एप्रिलला पार पडली.१८ संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत शेतकरी महाविकास आघाडी पॅनलचे १२ तर भाजपा समर्थित शेतकरी विकास आघाडीचे ६ उमेदवार निवडून आले.

हेही वाचा:- बाजार समितीच्या निकालानंतर काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील बालेकिल्ला असलेल्या कृ.उ.बा.समीतीवर अखेर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असल्याने ना. मुनगंटीवार यांचा मॅजिक संपला असल्याची प्रतिक्रिया उमटायला लागली आहे. यात भाजपाच्या नियोजनाचा अभाव असल्यानेच कृउबा समितीत भाजपाची हार झाली असल्याचे बोलल्या जात आहे. भाजपा व महाविकास आघाडीने आपापल्या परिने निवडणूक व्युहरचना आखली होती मात्र महाविकास आघाडीने यात बाजी मारली. शेतकरी महाविकास आघाडी पॅनलचे सर्वसाधारण गटातील विजयी उमेदवार रविंद्र मरपल्लीवार,विनोद थेरे,प्रविण पिद्दुरकर,वसंत पोटे,विलास मोगकार,प्रफुल लांडे,अशोक साखलवार तर महिला गटातून भारती बदन,सुनंदा गोहणे,इतर मागास वर्ग गटातून वासुदेव पाल तर विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून आशिष कावटवार,व हमाल व मापारी गटातून विनायक बुरांडे विजयी झाले. सेवा सहकारी संस्था मतदार संघातून ११ पैकी ११ हि संचालक निवडून आल्याने भाजपाचा सेवा सहकारी संस्थेतून सुपडा साफ झाला आहे तर हमाल व मापारी गटातही महाविकास आघाडीने यात बाजी मारली आहे.

‘ते’ मोठे लोक, आम्ही त्यांच्यापुढे टिकू शकणार नाही; वडेट्टीवारांची गांधीगिरी….

➡️
 भाजपा समर्थित शेतकरी विकास आघाडी पॅनलच्या ग्रामपंचायत मतदार संघाच्या सर्वसाधारण गटातून नैलेश चिंचोलकर,नितेश पावडे तर अनुसूचित जाती व जमाती गटातून रविंद्र गेडाम,आर्थिक दुर्बल घटक गटातून धनराज सातपुते हे निवडून आले.तर अडते व व्यापारी गटात सुनील कटकमवार व राकेश गव्हारे यांचा विजय झाला आहे.ग्रामपंचायत गट व व्यापारी गटात भाजपाच्या पॅनलने बाजी मारत भाजपाचा नाव राखलं असलं तरी पालकमंत्र्याच्या बालेकिल्ल्याला पडलेली खिंडार पुढच्या येणाऱ्या निवडणूकांवर याचा प्रभाव पडणार असे आता बोलल्या जात आहे.

पोंभुर्ण्यावरुन पुन्हा पेटला वाद

पोंभूर्णा कृउबा समीतीच्या श्रेयवादावर मोठी चर्चा रंगली असून माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर आता आमने सामने आले आहे. वड्डेटीवार यांनी पोंभूर्ण्यात कांग्रेसची सत्ता येईल असे वक्तव्य केले होते व ते खरे ठरले मात्र खासदार बाळू धानोरकर यांनी पोंभूर्ण्यांच्या विजयाचा श्रेय कुणीही घेऊन स्वतःची पाठ थोपटवू नये असे बाळू धानोरकर यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता म्हटले आहे. यामुळे श्रेयवादाची पोंभूर्णा तालुक्यात खमंग चर्चा होत आहे.
पोंभुर्णा कृ.उ.बा समितीतील विजय हा महाविकास आघाडीचा विजय आहे. खासदार बाळू धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढलो.आमदार विजय वडेट्टीवार,कॉग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, विनोद अहिरकर, जगन येलके, राजेंद्र वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत उतरली होती. आणि म्हणूनच १२ जागांवर आम्ही विजय मिळविला.
रविंद्र मरपल्लीवार, तालुका अध्यक्ष कांग्रेस कमेटी पोंभूर्णा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने