अपघातग्रस्त युवकांच्या मदतीसाठी अहिर यांनी थांबविला ताफा #chandrapur #accident


चंद्रपूर:- दि.२ मे रोजी आज सकाळी 8.45 च्या दरम्यान चंद्रपूर-बल्लारशाह बायपास रोड वर अपघातात जखमी झालेल्यांना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी स्वतः ऑटो ला थांबवून जखमींना दवाखान्यात पाठवण्यास मदत केली व सरकारी हॉस्पिटल डॉ. जीवने यांना संपर्क करीत जखमींना तात्काळ उपचार देण्याच्या सूचना केल्या.

या अपघाताची हॉस्पिटल मधील दखल घेण्याकरिता श्री. हंसराज जी अहिर ( राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री भारत सरकार) यांनी आपल्या समर्थकांना आदेश दिले आणि त्या आदेशानुसार राहुल सूर्यवंशी आणि अंकित जोगी यांनी दुपारी १२:०० च्या दरम्यान सरकारी हॉस्पिटल गाठून अपघात झालेल्या रुग्णाची प्रकृती विचारपूस केली आणि तिथे ड्युटी वर कार्यरत असलेल्या स्टाफ वर्गाला श्री. हंसराज जी अहिर यांच्या सूचनेनुसार त्या अपघात झालेल्या रुग्णा कडे आणि तिथे भरती असलेल्या अन्य रुग्णांच्या उपचाराकडे लक्ष देण्यास सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत