भांडणात मध्यस्थी करणाऱ्या बार मॅनेजरच्याच डोक्यात फोडला काचेचा ग्लास #chandrapur #nagpur #crime


Google ads.
नागपूर:- दोन ग्राहकांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका बार व्यवस्थापकालाच त्यांनी बेदम मारहाण करत डोक्यावर काचेचा ग्लास फोडला. यात संबंधित मॅनेजर जखमी झाला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

गुरुवारी मध्यरात्री हिंगणा मार्गावरील रंगोली बार ॲंड रेस्टॉरेन्ट येथे सोमेश गणेश साऊतकर (२९, काचीपुरा) व सौरभ प्रवीण काळसर्पे (२८, संभाजी नगर, मनमाड) हे दोघेही आले होते. लहानशा गोष्टीवरून त्यांच्यात वाद सुरू झाला. फॅमिली रूममध्ये हे भांडण होत असल्याने मॅनेजर महेश जयस्वाल (५७) हे मध्यस्थी करण्यासाठी गेले. त्यांनी दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला. यावरून दोन्ही आरोपी संतापले व त्यांनी आपापसातले भांडण बाजूला ठेवून जयस्वाल यांनाच शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. एका आरोपीने त्यांच्या डोक्यावर काचेचा ग्लास फोडला. यात ते जखमी झाले. जयस्वाल यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला व दोघांनाही अटक करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत