Top News

पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मुली बुडाल्या #chandrapur #pune #death #KhadakwaslaDam


सात जणींना वाचवण्यात यश, दोन मुलींचा मृत्यू

Google ads.
पुणे:- खडकवासला धरण परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मुली बुडाल्या आहेत. या नऊ मुलींपैकी सात मुलींना बाहेर काढण्यात यश आले आहे. परंतु दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. गोऱ्हे खुर्द तालुका हवेली गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी त्यापैकी सात मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले तर दोन मुली अद्याप सापडल्या नाहीत. हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जवान दाखल होत आहेत.

चिचडोह बॅरेज मध्ये चार युवकांचा बुडून मृत्यू

कलमाडी फार्म हाऊसजवळ खडकवासला धरणाच्या पाण्यात आज सकाळी नऊ मुली पोहण्यासाठी उतरल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वच्या सर्व नऊ मुली पाण्यात बुडू लागल्या. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी मुलींना वाचविण्यासाठी धाव घेतली. दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली.

खुशी संजय खुर्दे (वय 14 वर्ष ), शीतल भगवान टिटोरे (वय 15 वर्ष) या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे. पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या या सगळ्या मुली बुलढाणा जिल्ह्यातील असून पुण्यातील गोरे खुर्द गावात त्यांच्या नातेवाईकाकडे बारशाचा कार्यक्रमाला आल्या होत्या. या दोघींच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने