ना. मुनगंटीवार यांना मोठा धक्का; पोंभुर्णात महाविकास आघाडीला मोठे यश #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0 minute read


पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा, गोंडपिपरी भद्रावती या तीन बाजार समितीची मतमोजणी पार पडली. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे क्षेत्र असलेल्या पोंभुर्ण्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले.

हेही वाचा:- महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत घडला होता रक्तपात

भाजपा समर्पित शेतकरी विकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. केवळ सहा जागा त्यांना जिंकता आल्या. तर शेतकरी महाविकास आघाडी समर्पित पॅनला मोठे यश मिळाले आहे. बारा जागेवर विजय मिळवीत पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ता काबीज केली आहे. पोभुर्णा येथील पराभव ना. मुनगंटीवार यांच्यासाठी मोठा धक्का असल्याच बोललं जातं आहे.