राजुरा:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित उपसभापती संजय पावडे यांची निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत खामोना च्या वतीने ग्रामपंचायतचे सरपंच हरिदास झाडे, उपसरपंच शारदा तलांडे तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजयभाऊ धोटे माजी आमदार राजुरा, कार्यक्रमाला मुख्य अतिथी सुदर्शन निमकर माजी आमदार राजुरा, सत्कारमूर्ती राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित उपसभापती संजय पावडे हे होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते जनसुविधा योजने अंतर्गत दहा लक्ष रु. सिमेंट काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सरपंच हरिदास झाडे यांनी केले. मान्यवरांनी येथील जनतेच्या वतीने केलेल्या मागण्या प्राधान्यक्रमाने सोडविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
कार्यक्रमात ग्रामपंचायतचे उपसरपंच शारदा तलांडे, ग्रामपंचायत सदस्य कडूजी सातपुते, सौ सोनू ठक, रामदास पाटील गीरसावडे, बाबुराव पा. चन्ने, पुंजाराम पा. ठक, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख सुधाकर चंदनखेडे, पोलीस पाटील खामोना विजय पादे, युवा कार्यकर्ते दिलीप गिरसावडे व मान्यवर तथा मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बोबडे यांनी केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत