चंद्रपूर:- वरोरा शहरातील फुकट नगर येथे एका तरुणाची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. रीतेश लोहकरे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेतील आरोपी विकी उर्फ अवनीश रेड्डी यास अटक करण्यात आली असून तो पळून जाण्याच्या तयारीत असताना नागपूर येथील रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेण्यात आले आहे. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
रितेश चा मृतदेह हा मानवी वस्ती पासून अगदी पन्नास मीटर अंतरावर आढळला. मात्र ही घटना होत असताना जवळच्या एका पानठेला चालकाने बघितली. हत्येचा थरार बघून तो घाबरून तिथून पळून गेला. या संदर्भात नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी सदर पानठेला चालकास सुद्धा ताब्यात घेऊन घटनेची शहानिशा केली. तेव्हा त्याने एका तरुणाने लाकडी दंड्याच्या साह्याने त्याच्या डोक्यावर वार करुन हत्या केल्याचे सांगितले. पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमोल काचोरे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. सदर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
Sir kadak karvahi kara
उत्तर द्याहटवा