सुंदर चेहरा व सुंदर मन हे यशस्वी आयुष्याचं प्रतीक:- ना. सुधीर मुनगंटीवार #chandrapur

Bhairav Diwase

डीएसव्ही मिसेस इंडिया महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेचे दिमाखदार आयोजन

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- सुंदर चेहरा व सुंदर मन हे यशस्वी आयुष्याचं प्रतीक आहे. यशस्वी आयुष्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा जगभर आयोजित होतात . चंद्रपूरात या स्पर्धेसाठी अनुरिता ढोलकीया, सोहेल खान यांनी ताई फाउंडेशन च्या सहकार्याने या स्पर्धेच्या आयोजनासाठी घेतलेला पुढाकार अभिनंदनीय आहे.

चंद्रपूर विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रगतीच्या शिखरावर जावे अशी माझी कायम इच्छा आहे. अशा उपक्रमांच्या मी सदैव पाठीशी आहे. असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
अनुरिता ढोलकीया , सोहेल खान यांच्या द्वारे आयोजित डीएसव्ही मिसेस इंडिया महाराष्ट्र 2023 या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. जगातले सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहेत , प्रत्येक वेळी चंद्रपूर ने आपले वैशिष्ट्य व श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. या सौंदर्य स्पर्धेच्या माध्यमातून देखील चंद्रपूरचे श्रेष्ठत्व अधोरेखित झाले असल्याचे ते म्हणाले.गोमती पाचभाई व अनुरिता ढोलकीया यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी विशेष अतिथी म्हणून श्री व सौ सुरज सादमवार , श्री व सौ पवन सादमवार यांची उपस्थिती होती.मिसेस इंडिया सुपर मॉडेल डॉ झवेरीया डीएसव्ही,डीएसव्ही मिसेस ग्रँड इंडिया श्रीमती वैशाली मानमोडे , मिसेस इंडिया 2017 अस्मा उपरे यांनी स्पर्धेचे कुशल परीक्षण केले.
आश्लेषा डीएसव्ही मिसेस इंडिया 2023 च्या किताबाच्या मानकरी ठरल्या. सेलेब्रिटी पाहुण्या सुहासी धामी यांनी क्राउन प्रदान करत त्यांना सन्मानित केले.प्रियांका 1 रनर अप , प्रयाली 2 रनर अप , अतिषा 3 रनर अप तर आकांक्षा 4 रनर अप ठरल्या .याशिवाय विशेष इंटरेस्टेड क्राउन डीएसव्ही मिसेस इंडिया महाराष्ट्र नेशन संगीता कुकडे यांना प्रदान करण्यात आला.डीएसव्ही मिसेस इंडिया महाराष्ट्र वूमन ऑफ डीग्नीटी नीना नगराळे , डीएसव्ही मिसेस इंडिया वूमन ऑफ सब्सस्टन्स स्वप्ना राऊत यांना देखील गौरविण्यात आले.
हा उपक्रम एलिव्हेट प्रा. लि. तर्फे सह प्रायोजित करण्यात आला होता तर ताई फाउंडेशन , बेकर्स ब्लिस यांच्या विशेष सहकार्यातुन उपक्रम सम्पन्न झाला.