महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ अशी ५ आयपीएल जेतेपदं नावावर केली आहेत. मुंबई इंडियन्सनंतर आयपीएलची पाच जेतेपदं नावावर असलेला CSK दुसरा संघ ठरला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे CSK समोर १५ षटकांत १७१ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले आणि सामना अत्यंत चुरशीचा झाला, परंतु रवींद्र जडेजाने शेवटच्या २ चेंडूंवर १० धावा करून रोमहर्षक विजय मिळवून दिला. मध्यरात्री ३ वाजेपर्यंत धोनीला ऐकण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित होते आणि त्यांना जे अपेक्षित होते, तेच धोनीने केले.
https://www.adharnewsnetwork.com
Google ads.
यापेक्षा चांगला दिवस निवृत्तीसाठी असूच शकत नाही, परंतु ज्या पद्धतीने चाहत्यांनी प्रेम दाखवलं आहे. त्यांना सध्यातरी मी फक्त धन्यवाद म्हणतो... आता चेंडू माझ्या कोर्टात आहे... ८-९ महिने आहेत आणि ते माझ्यावर आहे की तंदुरुस्ती राखून कमबॅक करतो की नाही... चेपॉकवरील पहिल्या सामन्यात सर्व माझ्या नावाची घोषणाबाजी करत होते. ते पाहून माझे डोळे पाणावले होते. मला डग आऊटमध्येच बसून रहावेसे वाटले. या क्षणाला मला आणखी आनंद घ्यायचाय. मी जसा आहे, तसा मी त्यांना आवडतो.. माझे पाय जमिनिवर आहेत म्हणून मी त्यांना आवडतो, असे धोनी म्हणाला. त्याने आणखी एक आयपीएल पर्व खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे चाहत्यांनी एकच कल्ला केला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक २५० सामन्यांत धोनीने ५०८२ धावा केल्या आहेत. त्यात २४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने १४२ झेल व ४२ स्टम्पिंग्सही केले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७चा ट्वेंटी-२०, २०११ चा वन डे वर्ल्ड कप जिंकला आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. आयसीसीच्या या तिन्ही स्पर्धा जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. त्याने ९० कसोटींत ६ शतकं व ३३ अर्धशतकांसह ४८७६ धावा केल्या आहेत. ३५० वन डे सामन्यांत त्याच्या नावावर १०७७३ धावा आणि १० शतकं व ७३ अर्धशतकं आहेत. ९८ ट्वेंटी-२०त त्याने १९१७ धावा केल्या आहेत.