गुजरातला नमवत थालाची CSK ठरली IPL चॅम्पियन! Namwat Thala's CSK beat Gujarat to become IPL champions!


https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

आयपीएल २०२३ स्पर्धेला अखेर विजेता संघ मिळाला आहे. स्पर्धेतील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने जोरदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. यासह आयपीएल स्पर्धेतील जेतेपदावर पाचव्यांदा नाव कोरले आहे.
महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ अशी ५ आयपीएल जेतेपदं नावावर केली आहेत. मुंबई इंडियन्सनंतर आयपीएलची पाच जेतेपदं नावावर असलेला CSK दुसरा संघ ठरला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे CSK समोर १५ षटकांत १७१ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले आणि सामना अत्यंत चुरशीचा झाला, परंतु रवींद्र जडेजाने शेवटच्या २ चेंडूंवर १० धावा करून रोमहर्षक विजय मिळवून दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत