Click Here...👇👇👇

नृत्यांगण डान्स स्कूल चे सुयश, ‘कथक’ नृत्य सत्र परीक्षा 2023 निकाल घोषित #chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- ‘नृत्यांगण डान्स स्कूल’ या केंद्राच्या विद्यार्थिनींनी ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल, मुंबई’ व्दारा आयोजित 2023, मे महिन्यातील सत्राच्या परीक्षेत ‘कथक’ या शास्त्रीय नृत्य शैलीत केंद्राचा एकूण 100 टक्के परिणाम प्राप्त करून उत्कृष्ट यश संपादन केले आहे.

कथक या शास्त्रीय नृत्याचा उत्तरोत्तर विकास चंद्रपूर शहरात व्हावा आणि आपल्या भारतीय संस्कृतीची जोपासना व्हावी या उददे्शाने कु प्राजक्ता लक्ष्मीकांत उपरकर यांनी ‘नृत्यांगण डान्स स्कूल’ या नृत्य केंद्राची स्थापना केली. कथक नृत्याच्या प्रारंभिक परीक्षेत अंजली आक्केवार, प्रवेशिका प्रथम परीक्षेत सौम्या लोखंडे आणि तनिष्का चहारे, प्रवेशिका पूर्ण परीक्षेत परी चौधरी या विद्यार्थिनींनी विशेष योग्यता प्राप्त केली आहे. तसेच स्पृहा देव, अनन्या देशमुख, अन्वी चोरे, सान्वी घाटे या विद्यार्थिनींनी ‘मध्यमा प्रथम’ परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त केल्याने विद्यार्थिनींच्या या अपूर्व यशाबद्दल ‘नृत्यांगण डान्स स्कूल’ च्या संचालिका कु. प्राजक्ता उपरकर(M. A.कथक सुवर्णपदक प्राप्त, कथक नृत्य विशारद) यांनी सगळयांचे मनापासून कौतूक केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतूकांचा वर्षाव होत आहे.