केक कापायला गेला अन् तोंडच जळालं, बर्थडे बॉयसोबत काय घडलं? #Chandrapur #wardha #fire #socialmedia #viralvideo

Bhairav Diwase
0

वर्धा:- वर्ध्यात एका तरूणाला वाढदिवसाच सेलिब्रेशन करण चांगलच महागात पडलं आहे. कारण वाढदिवसाच आलिशान सेलिब्रेशन करताना फायरगणची ठिणगी डोक्यावर मारलेल्या स्प्रेवर पडून तरूणाच्या तोंडाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.

या घटनेत तरूण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. रितीक वानखेडे असे या बर्थडे बॉयचे नाव असून सुदैवाने मोठ्या अपघातातून तो बचावला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाढदिवस म्हटलं की आजकाल भन्नाट सेलिब्रेशन आलंच… अनेकजण फायरगण, भरमसाठ स्प्रे आणि पाच-सहा केक कापून आलिशान सेलिब्रशन करून वाढदिवस साजरा करतात. या संदर्भातली अनेक व्हिडिओ तुम्ही इंटरनेटवर पाहिले देखील असतील. अशाच सेलिब्रेशनचा प्लान वर्ध्यात राहणाऱ्या रितीक वानखेडे यांच्या मित्राने केला होता. ठरल्यानुसार तीन चार टेबलवर पाच-सहा केक ठेवण्यात आले होते. यावेळी काही मुले समोरून स्प्रे घेऊन उभी होती. तर दोन तरूण फायरगण घेऊन बर्थडे बॉयच्या मागी उभी होती. यावेळी बर्थडेचे सेलिब्रेशन सुरू होताच मित्रांनी रितीकच्या तोंडावर स्प्रे मारायला सुरुवात केली, त्यापाठोपाठ बर्थ डे बॉयच्या मागून फायरगण ही सुरू झाल्या. यावेळी फायरगणची ठिणगी रितीकच्या ड़ोक्यावर मारलेल्या स्प्रेवर पडली आणि त्यांच्या तोंडाला आग लागली होती.रितीकने यावेळी लगेच डोक्यावरचा सर्व स्प्रे झटकला आणि आग विझवून टाकली. या संपूर्ण सेलिब्रेशनच्या व्हिडिओ बनवणाऱ्या मित्राच्या कॅमेरात ही संपूर्ण घटना कैद झाली होती.

या घटनेत सुदैवाने मोठा अपघात टळला, तरी देखील रितीक जखमी झाला होता.त्यामुळे रीतीक वानखेडेला वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये रितीकच्या कानाला आणि नाकाला किरकोळ जखम झाली असल्याची माहिती आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान वर्ध्यातील या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)