Top News

ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या भाजपा पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित #chandrapur


चंद्रपूर:- चंद्रपुरातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे नावलौकिक असलेले ओबीसी , कुणबी समाजाचे नेते, विदर्भवादी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडचिट्टीकडून भाजपात प्रवेशाची तारीख निश्चित झाली आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजीनामा पक्ष श्रेष्ठीकडे पाठवणार असलेल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. ओबीसी समाजातील पोकळी भरून काढण्यासाठी आपण भाजपात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. येत्या दि. 25 जून 2023 रोजी जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर दुपारी ३.३० वाजता विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचा भाजप पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

पूर्व विदर्भातील विदर्भ विकास चळवळ व ओबीसी चळवळीतील अग्रणी नेतृत्व डॉ. अशोक जीवतोडे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विनंतीस मान देवून भारतीय जनता पक्षात प्रवेश होत आहे.

या सोहळ्याला प्रामुख्याने राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, वने, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी मंत्री श्रीमती शोभा फडणवीस, आमदार बंटी भांगडिया, आमदार परिणयजी फुके, आमदार संजीवजी बोदकुलवार, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार अतुल देशकर, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार संजय धोटे, भाजपाचे चंद्रपूर महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे तथा भारतीय जनता पक्षातील समस्त आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने