पंढरपूर येथील शिबिरात 56 निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान! #Chandrapur #pandharpur

Bhairav Diwase
पंढरपूर:- 'आपले जीवन परोपकारासाठी वेचल्यानेच त्याचे मोल वाढते’ या निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शिकवणूकीला अनुसरुन 56 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. प्रामुख्याने यामध्ये महिलांचाही समावेश असल्याचे सांगितले.

संत निरंकारी मिशन चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने सोलापूर झोन मधील पंढरपूर शाखेच्या सत्संग भवनात, रविवारी (ता. 18) रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक (मालक), संत निरंकारी मंडळ सोलापूर झोनचे झोनल प्रमुख इंद्रपाल सिंह नागपालजी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संतोष घोडके, भाजपा sc मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी वाघमारे, पंढरपूर शाखा प्रमुख सौ. गिता अनिल घोडके, दिगंबर वाघमोडे, गुंड सर, थोरात महाराज, गवळी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी आजुबाजुच्या शाखांचे मुखी तसेच सेवादल अधिकारी उपस्थित होते. या शिबिरामध्ये सरजूबाई बजाज ब्लड बँक व सिविल हॉस्पिटल सोलापूर ब्लड बँक या रक्तपेढीने रक्त संकलन केले. पंढरपूर शाखेचे प्रमुख सौ गीता अनिल घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सेवादल अधिकारी, सेवादल, सेवादल भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर शिबिराचे उत्कृष्ट सूत्रसंचालन तुकाराम कोळी (गुरुजी) यांनी केले.