शिक्षकाने ATM मध्ये केला तरुणीचा विनयभंग #chandrapur #gadchiroli #aheri

Bhairav Diwase
गडचिरोली:- शिक्षकाने ATM सेंटरमध्ये तरुणीचा विनयभंग केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडीत तरुणी ATM मध्ये पैसे काढण्यासाठी आली होती. मुलीच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळ एकच खळबळ उडाली असून महिला व तरुणींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी शहरात ही घटना घडली आहे. एटीएम मध्ये शिक्षकाने तरुणीचा विनयभंग केल्याने खळबळ उडाली आहे. अहेरी शहरातील मध्यवर्ती बँकेच्या शेजारी हे बँक एटीएम आहे. एटीएम मध्ये 19 वर्षीय मुलीला पाहून शिक्षकाने ATM सेंटरमध्ये प्रवेश केला. शिक्षकाने तिच्यासोबत बळजबरी सुरू केली. मात्र मुलीने प्रतिकार करताच आरडाओरड झाल्याने नागरिक एकत्र झाले.

शिक्षकाने अचानक छेड काढल्याने तरुणी भयभित झाली. तिचा आराओरडा ऐकून नागरिक मदतीसाठी धावून आले. यावेळी आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांनी त्याला पकडून ठेवत चोप दिला. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शिक्षकाला ताब्यात घेतले. हा शिक्षक तालुक्यातील एका आश्रमशाळेत शिक्षक असल्याची माहिती आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहेरी पोलिसांनी एटीएम मधील फुटेज हाती घेतले असून त्यात नेमकी घटना काय झाली याचा उलगडा होणार आहे. सध्या पोलिसांनी महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या नेतृत्वात याप्रकरणी तपास चालविला आहे.