चिमूर:- दिनांक 26 जून 20230 रोजी ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे समान संधी केंद्र द्वारा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती व सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. 26 जून म्हणजे "राजर्षी छत्रपती शाहू महाराज" यांचा जन्मदिवस. महाराष्ट्र शासन द्वारा हा दिवस “सामाजिक न्याय दिन” म्हणून पण साजरा करण्यात येतो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ . अमीर धमानी सर यांनी सांगितले की "राजर्षी छत्रपती शाहू महाराज" महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक होते . प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण आदी सुधारणांचे पुरस्कर्ते होते. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे ते भारतातील पहिले राज्यकर्ते होते. मागासलेल्या जातींत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने व त्याचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी लाभण्याची शक्यता नसल्याने त्यांनी कोल्हापूर संस्थानातील ५० टक्के शासकीय नोकऱ्या मागास वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला होता . सन 2006 मध्ये शासनाने इतिहास अभ्यासकांची समिती स्थापन केली . या इतिहास अभ्यासकांची समितीने आपला अहवाल सादर केला आणि तेव्हा 2006 पासून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्यात येतो.
समाजसुधारक राजे अनेक होऊन गेले, परंतु समाजक्रांतिकारक राजे शोधूनही सापडणे कठीण. असा दुर्मिळ राजे होण्याइतके कार्य शाहू महाराजांकडून घडले म्हणून त्यांचे नाव आजही सर्वांच्या स्मरणात राहिले आहे व पुढेही राहिल. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.