Click Here...👇👇👇

बल्लारपूर विदर्भातील पहिला 'ओडीएफ प्लस' तालुका घोषित #chandrapur #ballarpur

Bhairav Diwase

बल्लारपूर:- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे सुरू असून, यामध्ये बल्लारपूर तालुक्यातील गावे ओडीएफ प्लसच्या मानकांमध्ये बसत असल्यामुळे नुकताच बल्लारपुर तालुका उदयमान या घटकात ओडीएफ प्लस घोषित करण्यात आला असून, बल्लारपूर तालुका विदर्भातील पहिला ओडीएफ प्लस तालुका ठरला आहे.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 मध्ये ओडीएफ प्लस करताना उदिमान, उज्वल व उत्कृष्ट या तीन घटकामध्ये घोषित केल्या जातो. बल्लारपूर तालुक्यात 17 ग्रामपंचायती असून, 26 गावे या तालुक्यामध्ये आहेत. यापैकी 10 गावे उत्कृष्ट या घटकातून ओडीएफ प्लस म्हणून घोषित करण्यात आली. तर, 16 गावे उदयमान या घटकातून ओडीएफ प्लस म्हणून घोषित करण्यात आली. त्यानुसार बल्लारपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिरूद्ध वाळके यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे बल्लारपूर तालुका उदयमान या घटकात ओडीएफ प्लस झाल्याचे जाहीर केले आहे. या अगोदर सन 2016 मध्ये बल्लारपूर तालुक्याला विदर्भातील पहिला हागणदारीमुक्त तालुका होण्याचा मान मिळाला होता. तीच परपंरा बल्लारपूर तालुक्याने कायम ठेवली आहे. बल्लारपूर तालुका विदर्भातील पहीला ओडीएफ प्लस तालुका झाला असून, जिल्ह्याकरिता अभिमानाची बाब आहे. अशाच पद्धतीने जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन टप्पा-2 अंतर्गत भरीव कामे करुन चंद्रपूर जिल्हा ओडीएफ प्लस करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी नुतन सावंत यांनी केले आहे.