विठुरायाच्या गजरात भाजपाने केले आषाढी एकादशी शोभयात्रेचे स्वागत #chandrapur #bjpchandrapur

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या वढा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे बुधवारी माता महाकालीचे दर्शन घेऊन चंद्रपूर येथील वारकरी स्वामी चैतन्य महाराज यांच्या समवेत आपल्या लाडक्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत जात आहेत. त्यांच्या सोईसाठी व एकादशीचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्हा महानगर भाजपच्या वतीने वारीतील भक्तांना चहा व नास्ताचे वितरण करण्यात आले. (BJP welcomed the Ashadhi Ekadashi parade amid Vithuraya's alarm)

स्थानिक गिरनार चौक येथे वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले आणि वारीत सामील होऊन भाजपा पदाधिकाऱ्यानी फुगडी रींगन खेळून श्री चैतन्य महाराज यांना ओक्षवंत करून पुढच्या प्रवासासाठी अभिवादन केले.

याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार व राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा महानगर भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, महानगरमंत्री सुभाष कसंगोट्टूवार, रवी गुरनुले, ग्रामीण महामंत्री नामदेव डाहुले, मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवर, रवी लोणकर, दिनकर सोमलकर,महिला मोर्चा मंत्री शिलाताई चव्हाण आदिसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाविक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)