राजुरा येथे चार दुकानांवर धाड; लाखोंचा सुगंधित तंबाखू जप्त #chandrapur #Rajura

Bhairav Diwase
0

संग्रहित छायाचित्र
राजुरा:- शहरात सुगंधित तंबाखू गुटखा विक्री होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावरून राजुरा पोलिसांनी शहरातील दुकानांवर धाड टाकत लाखो रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. (Four shops raided at Rajura; Flavored tobacco worth lakhs seized)

शहरातील दुकानदार खालिद एजाज हुल्ला यांच्या महाराष्ट्र किराणा दुकानात झडती घेतली असता प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला. याची किंमत सहा लाख २५० रुपये आहे, तसेच पुंडलिक रागीट यांच्या लक्ष्मी किराणा दुकानात झडती घेतली असता विविध कंपनीचे एकूण ३४ हजार ४९० रुपयांचा सुगंधित तंबाखू मिळून आला. अशोक ठक्कर यांच्या जय अंबे किराणा आणि गोडाऊनमध्ये धाड टाकून एक लाख एक हजार ४८६ रुपयांचा सुगंधित तंबाखू आढळला. कर्नल चौक येथील मनीष पिंजवाणी यांच्या मनीष किराणा दुकानातून एक हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला.

पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासन विभाग यांना कळविण्यात आले आहे. सदर कार्यवाही डीवायएसपी नागरगोजे, एपीआय जोशी, पीएसआय हाके, पीएसआय गेडाम यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)