Top News

सहज स्वभावातील कठोर व कर्तव्यदक्ष ठाणेदार धर्मेंद्र जोशी #chandrapur #police #article

पोलिस खात्यात अधिकारी म्हणून जगतांना नेहमी एक स्टील फ्रेम असतो. धाक, दरारा, फौजफाटा अन् वर्दीतील कठोर माणूस, कुणा-कुणासाठी तर हिटलरच असतो असा सिधा साधा परिचय. खरं तर पोलिस अधिकारी हा असाच असतो. पण धर्मेंद्र जोशी हा अधिकारी अश्या सो कॉल्ड चौकटीत कधीच अडकून पडला नाही. तो त्याच्या हटके कामामुळे त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्या कारर्किर्दीत मक्तेदारी, ओळख-पाळख व प्रेशर याला कधी त्यांनी थाराच दिला नाही. आणि म्हणूनच तो पोंभूर्ण्यात पुर्ण वेळ टिकलाही. आपली पोंभूर्णा शहरातील ठाणेदार पदाची कर्तव्याची पुर्ण कारर्किर्द पुर्ण करूनच.

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा पोलिस स्टेशन येथे दि. १ मार्च २०२१ ला ठाणेदार म्हणून धर्मेंद्र जोशी हे रूजू झाले. पोंभूर्ण्यात पोलिस अधिकारी जास्त काळ टिकत नाही हा समज तसा बऱ्याच दिवसांपासून पोंभूर्ण्यात सुरू आहे. हाही अधिकारी असाच राहिल, काही दिवस काम करेल मग होईल हकालपट्टी. हा मत नक्कीच सर्वांनाच ज्ञात होतं. पण तसं झालं नाही.

ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांनी पोंभूर्ण्यात रुजू झाल्यानंतर पहिलं काम त्यांनी सर्व सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन आपल्या कामाची भुमिका काय हे स्पष्ट करत कायदा सर्वांसाठी सारखा असतो कायद्यासाठी निडर भुमिका घेत काम करण्याची पद्धत स्पष्ट केली. यात फायदा असं झालं की पोलिस कर्मचारी प्रेशरविरहीत काम करू लागलीत. दुसरा काम त्यांनी शांतता व सुव्यवस्थेचा दुवा असलेल्या पोलीस पाटील यावर काम केला. आजही ग्रामीण भागात गावाची शांतता व सुव्यवस्था पोलिस पाटलावर बऱ्यापैकी आधारीत आहे हे ठाणेदार जोशी यांना ज्ञात असल्यामुळे गावातील शांतता टिकावी व तंटे कमी व्हावीत यासाठी त्यांनी पोलिस पाटलांना महत्व देत त्यांच्या बैठका घेऊन त्यांच्या कामाबद्दल त्यांना प्रोत्साहन दिले. सहकार्याने‌ काम करण्यासाठी आश्वस्त केले. पोंभूर्णा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या पोलिस पाटिलांनी आपली कर्तव्याची भुमिका चोख बजावली. त्यात जोशी खरे उतरले.

पोलिस खाते म्हटले की गुन्हे आलेच, दडपण आले हे सर्व असतांना सुद्धा त्यांनी मोठ मोठे गुन्हे सहज सोडविले. काही गुन्ह्यात तर प्रेशर असतांनाही ते डगमगले नाही. ज्यांनी गुन्हा केला त्याला माफी मिळाली नाही. गुन्हेगाराला त्यांनी कधी माफीही दिली नाही. पण सहज स्वभाव असल्यामुळे त्यांची काम करण्याची पद्धत जरा हटके असल्यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीच्या हरणांना दमवून मग त्यांना धरदबोचण्याची पद्धती फार भारी होती. अनेक प्रकरणावर त्यांनी कठोरपणे काम केले. हा कठोरपणा भविष्यात मोठी घटना घडू नये यासाठीच. महिलांवरील अन्याय, अत्याचार वा् त्यांच्या संबंधित असलेले गंभीर प्रकरणं त्यांनी तातडीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून मार्गी लावले.

त्यांच्या कार्यकाळात राजकीय वातावरण कधी तापू दिलं नाही. किंवा तशी परिस्थिती उद्भवली नाही. काही घटना घडल्या असल्या तरी फार शांततेत हाताळले. हि कसब फार कमी लोकांना जमते त्यातले जोशी आहेत हे नक्कीच सांगता येईल. पोंभूर्णा शहरात अनेक हायव्होल्टेज मोर्चे झाले पण त्यांनी ते शांततेत सांभाळले. एवढेच नव्हे तर कोणतेही गालबोट लागू दिला नाही.

ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांनी पोंभूर्णा पोलिस ठाण्याचे ठाणेदार म्हणून २ वर्षाचा कालावधी पुर्ण केला. एवढेच नव्हे तर २६ दिवस त्यांनी जास्त काळ सेवा दिली हे अधोरेखित करण्यासारखे आहे. इतका काळ टिकणारे आतापर्यंतचे ते पहिलेच ठाणेदार. पोंभूर्णा शहर व ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांची कार्यपद्धती जबरदस्त राहिली. अनेक प्रकरणं सामंजस्याने सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. ते सहज स्वभावाचे तर होतेच पण मृदूभाषी होते, मार्गदर्शक होते. अनेकांना त्यांनी आपलेसे केले आहे.

कठोर आवरणाखाली मृदुभाषी स्वभाव हे वेगळे रसायन ठाणेदार धर्मेंद्र जोशी त्यांची हटके आयडेंटिटी आहे. ती अशीच राहिल. ते बदलणार नाहीत आणि ते बदलूही नयेत.
ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांचे वडील त्यांना म्हणतात "लाचारावर अत्याचार होता कामा नये, ते आपल्या डोळ्यासमोर होवूच द्यायचा नाही. आपणाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे" हे वडिलांचे तत्वज्ञान ते आदेश म्हणूनच पाळतात. ठाणेदार धर्मेंद्र जोशी हे आपल्या वडिलांना आदर्श मानतात ते वडिलांनी दिलेल्या मार्गदर्शनाची, तत्वज्ञानाची शिदोरी घेऊन मार्गक्रमण करीत आहेत.

ठाणेदार धर्मेंद्र जोशी या कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याचा कार्यकाळ हा रंजल्या गांजलेल्यांना न्याय देणारा राहो. हेच या निमित्ताने अपेक्षा व सदिच्छा. आपली दिवसेंदिवस बढती होत राहो या सदिच्छासह.

आता सहा. पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी राजुरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत.

#manipur #chnadrapurrain #rain #Talathi #Forest #police #udaanthecareeracademychandrapur #Adharnewsnetwork #bhairavdiwase #forestdepartment  #Trending #Trendingnews  #Women'sWorldCup
#JoeBurrow #UtopiaTravisScott
#Aliens  #ShoheiOhtani  #TylerChilders #RandyMeisner  #Wordlehint #PostMalone  #ZionWilliamson #NancyMace  #Chivas #JalenRamsey  #googleadsense  #blogger #Sudhirmungantiwar #pombhurna #chandrapur #Gondwanauniversity #police

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने