चहा बनवायला घरी आला अन् गळफास घेतला #chandrapur #Gadchiroli

गडचिरोली:- गावालगतच असलेल्या शेतावरून धान रोवणीचे काम करीत असताना चहा बनवायला घरी आलेल्या युवकाने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. ही घटना गुरूवार २७ जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास गडचिरोली तालुक्याच्या चांभार्डा येथे उघडकीस आली.

मिथून काशिनाथ बावणे (२८ वर्षे) रा. चांभार्डा असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सध्या धान रोवणीचा हंगाम सुरू असल्याने बावणे यांच्या शेतातही रोवणीचे काम सुरू आहे. गावाला लागूनच असलेल्या त्यांच्या शेतीत गुरूवारी धान रोवणी सुरू होती. दरम्यान दुपारी १ वाजताच्या सुमारास मिथून हा घरी चहा बनवण्यासाठी आला. परंतु तो अर्धा तास उलटूनही परत न आल्याने त्याचे वडील काशिनाथ बावणे हे घरी आले. त्यांनी घरी आतमध्ये जाऊन पाहिले असता मिथून हा गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. मुलाला ह्या स्थितीत पाहताच त्यांची भंबेरी उडाली व त्यांनी रडतानाच आरडाओरड केली. तेव्हा परिसरातील नागरिक गोळा झाले. यानंतर आरमोरी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. मात्र, मिथूनच्या आत्महत्येमागील नेमके कारण कळू शकले नाही.

#manipur #chnadrapurrain #rain #Talathi #Forest #police #udaanthecareeracademychandrapur #Adharnewsnetwork #bhairavdiwase #forestdepartment  #Trending #Trendingnews  #Women'sWorldCup
#JoeBurrow #UtopiaTravisScott
#Aliens  #ShoheiOhtani  #TylerChilders #RandyMeisner  #Wordlehint #PostMalone  #ZionWilliamson #NancyMace  #Chivas #JalenRamsey  #googleadsense  #blogger #Sudhirmungantiwar #pombhurna #chandrapur #Gondwanauniversity

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत