पुर्नमुल्यांकनात गुणवाढ झाल्यास शुल्क परत देणार #chandrapur #gadchiroli #Gondwanauniversitygadchiroli

Bhairav Diwase
0

कुलगुरू बोकारे यांचा विद्यार्थी केंद्रीत व स्तुत्य निर्णय

चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेचा निकाल लागला आणि अनेक विद्यार्थ्यांना अत्यंत कमी गुण मिळाल्याने ते नापास झालेत. असे कसे झाले म्हणून अभाविप आणि अन्य विद्यार्थी संघटनांनी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे धाव घेतली. त्यावेळी कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचे समाधान करीत, अत्यंत तातडीने परीक्षा नियंत्रण मंडळाची बैठक बोलावली.

या बैठकीत ठरल्याप्रमाणे, तक्रारकत्या परिक्षार्थ्यांना त्यांच्याच महाविद्यालयांत त्यांची उत्तरपत्रिका दाखवली जाईल. त्यातही त्यांचे समाधान झाले नाही, तर त्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मुल्यांकन केले जाईल आणि त्यात त्यांचे 10 टक्के गुण वाढल्यास शुल्कही परत केले जाईल, अश्या या तातडीने घेतलेल्या कुलगुरंच्या स्तुत्य निर्णयांचे आता विद्यार्थ्यांकडून स्वागत होत आहे.
सोमवार, 24 जुलै रोजी अभाविप आणि भारतीय जनता युवा मोर्चा आदी संघटनांनी कुलगुरू डॉ. बोकारे यांना निवेदन दिले आणि चर्चा केली. डॉ. बोकारे यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न शांतपणे समजून घेतले आणि त्यावर उत्तम तोडगा दिला. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रशांत दोंतुलवार आणि सिनेट सदस्य संजय रामगिरवार उपस्थित होते. लगेच काही तासांमध्ये परीक्षा नियंत्रण मंडळाची बैठक आयोजित करून डॉ. बोकारे यांनी, विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनाविषयी सर्व समस्यांचे समाधान होईल, असे निर्णय घेतले. या बैठकीला प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे, डॉ. जी. एफ. सूर्या, डॉ. एस. एम. साकुरे, चिंतामणी वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर नक्षिणे, चिंतामणी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव वेगिनवार, सरदार पटेल महाविलयाचे सहायक प्राध्यापक डॉ. सतिश कन्नाके, रा. तु. म. नागपुर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. नविन मुंगले, संचालक (प्र.) परीक्षा व मूल्यमापन मंडळ देवेन्द्र झाडे आदी उपस्थित होते.
मुल्यांकन संदर्भात साधारणतः 2200 विद्यार्थ्याच्या तक्रारी विद्यापीठास प्राप्त झाल्याने, ज्यांच्या तक्रारी आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पालकांसह बोलावून त्यांना त्यांच्या लिखित उत्तरपत्रिका गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, विद्यार्थी सुविधा केंद्र चंंद्रपूर तसेच ब्रम्हपुरी, वरोरा, आरमोरी, अहेरी, चिमुर येथील संलग्नित महाविद्यालयांमध्ये दाखविण्यात येतील. गुणदानात तफावत आढळून आल्यास विद्यार्थी संख्येच्या 10 टक्के विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करण्यात येईल. त्यामध्ये चुकीचे गुणदान झाल्याचे निदर्शनास आल्यास संपूर्ण तक्रारकर्त्या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकांचे पुनश्च मुल्यांकन करण्यात येईल आणि पुनर्मुल्याकंनामध्ये एखाद्या विषयामध्ये 10 टक्क्यांच्यावर गुण वाढत असतील तर अशा विद्यार्थ्याचे पुनर्मुल्याकनासाठी भरलेले शुल्कही परत करण्यात येतील, असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
पुनर्मुल्यांकनाचे शुल्कही कमी होणार
पुनर्मुल्यांकनासाठी सध्या प्रती विषय 500 रूपये शुल्क विद्यापीठाकडून आकारले जाते. परंतु, विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांची परीस्थिती लक्षात घेता पुनर्मुल्यांकनासाठी प्रती विषय 300 रूपये प्रमाणे शुल्क आकारण्याबाबत अंतिम निर्णयासाठी व्यवस्थापन परीषदेच्या मान्यतेसाठी शिफारस करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. तसेच पुनर्मुल्यांकनासाठी दोन विषयाऐवजी जास्तीत जास्त तीन विषयाकरिता अर्ज करण्याची मुभाही विद्यार्थ्यांना देण्यात येण्याची शक्यता आहे.
एका महिन्यात फेरपरीक्षा घेणार....

जे विद्यार्थी लेखी परिक्षेत अनुत्तीर्ण झाले असतील अशा विद्याथ्यांची फेरपरीक्षा घेण्याबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. जे विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाले असतील अशा विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा त्वरित घेण्याचा निर्णयही सर्वानुमते यावेळी घेण्यात आला.

#manipur #chnadrapurrain #rain #Talathi #Forest #police #udaanthecareeracademychandrapur #Adharnewsnetwork #bhairavdiwase #forestdepartment  #Trending #Trendingnews  #Women'sWorldCup
#JoeBurrow #UtopiaTravisScott
#Aliens  #ShoheiOhtani  #TylerChilders #RandyMeisner  #Wordlehint #PostMalone  #ZionWilliamson #NancyMace  #Chivas #JalenRamsey  #googleadsense  #blogger #Sudhirmungantiwar #pombhurna #chandrapur #Gondwanauniversity #साभार

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)