Top News

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू #chandrapur #warora


वरोरा:- वरोरा तालुक्यातील खांबाडा येथील वीज वितरण कंपनीच्या खांबावर वीज दुरुस्ती करताना जीवंत तारांना स्पर्श झाल्याने खाली कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली. सतीश चंदू तोडासे (२२) वर्षे रा. फत्तापूर मृताचे नाव आहे. आर्थिक मदत मिळेपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा इशारा रात्री गावात तणाव निर्माण झाला. वीज वितरण व पोलिसांनी मध्यस्थी केल्याने तणाव निवडला.

फत्तापूर येथील सतीश तोडासे हा काही दिवस महावितरणच्या कंत्राटदाराकडे वीज दुरूस्तीची कामे करत होता. त्यानंतर कंत्राटदाराकडील काम सोडल्याची चर्चा आहे. मंगळवारी रात्री वीज दुरूस्तीसाठी एका खांबावर चढला असता जीवंत तारांना स्पर्श होऊन खाली कोसळून घटनास्थळावरच ठार झाला. दरम्यान, कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी करून मृतदेह उचलण्यास नकार दिला. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. नागरिकांनी घटनास्थळावर प्रचंड गर्दी केली. रात्री वीज वितरण कंपनीचे अधिकारी व पोलिस घटनास्थळी पोहोचल्याने तणाव निवडला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने