नांदा- आवाळपूर-बीबी परिसरात विजेचा लपंडावाने नागरीक त्रस्त.

Bhairav Diwase
0
नांदा- आवाळपूर-बीबी परिसरात विजेचा लपंडावाने नागरीक त्रस्त

तासागणीक विजेचा लपंडाव सुरू

घरगुती उपकरणे जळाल्यास जबाबदार कोण?

कोरपना:- आवाळपूर नांदा बीबी पूर हा संपूर्ण परिसर तालुक्यातील औद्योगिक परिसर म्हणून ओळखला जातो यामुळे या ठिकाणी असंख्य मोठे व लघुउद्योग सिमेंट कारखान्याचा आसरा घेत सुरू आहे शिवाय या परिसराची लोकसंख्या सुद्धा लाखाच्या वर आहे लोकवस्ती दाट असल्यामुळे महावितरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विजेचे जाळे या ठिकाणी पसरविण्यात आलेले आहे मात्र मागील आठ दिवसा पासून गडचांदूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मर्यादित कंपनी उपविभागीय गडचांदुर येथून पुरवठा होणाऱ्या विजेचा चक्क खेळ खंडोबाच झाल्याचे पाहायला मिळत आहे नैसर्गिक वातावरणामध्ये थोडाफार बदल किंवा नाही झाला तरी विजेचा पुरवठा तासा गणित खंडित होत असल्याचे दिसून येत आहे तसेच हवा आली लाईन गेली असाच काहीसा अनुभव नागरिकांना येतो आहे.

रस्त्यावर शेत शिवारात झाड पडणे विजेचा कडकडाट होणे असे बदल झाल्यास रात्र प्रामुख्याने पुरवठा खंडित केला जातो. जॉब तुटणे कंडक्टर तुटणे डीओ खराब होणे डीपीला आग लागणे हाय व्होल्टेज मुळे फेस जाणे झाडाची फांदी तारेला स्पर्श केल्यास वीज पुरवठा खंडित होणे शिवाय या परिसरामध्ये गावठाण आणि एजी फिटर मिक्स हे एकत्रित असल्यामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो आणि हा सर्व अडचणी वेळेवरती मेन्टेनन्स मरम्मत शिवाय पाहणी न केल्यामुळे घडत असतात त्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा नाहकत्रास सहन करावा लागत आहे. लाईनमेन व अधिकारी यांना विचारणा केली असता उडवा उडवी चे उत्तर देत उध्दट बोलून वेळ मारून नेत असल्याचे दिसून येत आहे.

आधीच सूर्य आग ओकत आहे शासनाच्या वतीने नागरिकांना इशारा वजा सूचना देण्यात आलेल्या असताना शिवाय परिसरात असणाऱ्या अल्ट्राटेक माणिकगड या सिमेंट कंपनीच्या माध्यमातून स्वनिर्मित वीज गरजेनुसार वितरण कंपनीला दिल्या जात असते असे असताना सुद्धा गडचांदूर वितरण कंपनीला याचा कदाचित विसर पडला असावा परिसरातील लोकसंख्येपैकी वीस टक्के अबाल वृद्ध व पंधरा टक्के छोट्या बालगोपालांची संख्या आहे यातच नवीन प्रसुती झालेल्या स्त्रियांची संख्या शेकडोच्या वर आहे. अशा उष्ण गरम वातावरण मुलाचे बे हाल होत असताना वारंवार वीज खंडित होणे हे जीवावर बेतले तर याला जिम्मेदार कोण असा प्रश्न सुध्दा नागरिक करू लागले आहे.

विद्युत वितरण सेवा ही निरंतर सतत न केल्यास परिसरातील नागरिक विविध राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था युवा मंडळ अनेक संघटनेच्या वतीने एकजुटीने मोठे तीव्र आंदोलन केल्या जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

(वारंवार जात असलेल्या लाईन संबंधात लाईनमेन यांना विचारना केली असता. नागरिकांनी मेन स्विच बंद करून ठेवावा अशी प्रतिक्रिया संदीप नगराळे लाईनमेन 
नांदा -आवाळपूर यांनी दिली)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)