निरोगी राहण्यासाठी योगा आवश्यक:- डॉ. वेगिनवार📷
पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज आॕफ सायन्स, पोंभुर्णा येथे नऊवा आंतरराष्ट्रीय योगा दिवस 21 जून रोज बुधवार ला महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभाग तर्फे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक डॉ. नक्षीने सर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वेगिनवार सर, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. संतोष कुमार शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये योगा दिवस साजरा करण्यात आला. 
📷
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. संतोष कुमार शर्मा यांनी विविध योगासनाचे प्रात्यक्षिक दाखवून त्यांचे दैनंदिन जीवनामध्ये काय फायदे आहेत याचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वेगिनवार सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात योगासनाचे महत्त्व विशद केले आणि समाजातील प्रत्येक व्यक्तिने निरोगी राहण्यासाठी योगासने करावी हे आवर्जून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष कुमार शर्मा यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन श्री. सतीश पिसे यांनी केले आणि आभार प्रा. अमोल गर्गेलवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या